महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मास्क न वापरणाऱ्या 4,185 जणांवर मुंबईत कारवाई, तर लॉकडाऊनमध्ये 31,550 आरोपींवर गुन्हे दाखल

20 मार्च ते 11 जुलै दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 14,696 प्रकरणात तब्बल 31550 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 4,287 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 10,650 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर, 16,613 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.

By

Published : Jul 13, 2020, 3:12 PM IST

मुंबई लॉकडाऊन कारवाई
मुंबई लॉकडाऊन कारवाई

मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. राज्यात लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवला गेला आहे. लॉकडाऊन मध्ये आता पर्यंत मास्क न वापरणाऱ्या 4,185 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

20 मार्च ते 11 जुलै दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 14,696 प्रकरणात तब्बल 31550 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 4,287 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 10,650 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर, 16,613 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.

लॉकडाऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1,459 गुन्हे दाखल करण्यात आले असून , मध्य मुंबईत 2,444 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर पूर्व मुंबईमध्ये तब्बल 2,523 गुन्हे दाखल झाले आहेत. पश्चिम मुंबईत 2,394 उत्तर मुंबईत 5,876 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात; विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात; तसेच पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details