महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कोरोना औरंगाबाद : जिल्ह्यात कोविडचे 113 नवे रुग्ण, एकूण संख्या 2739 वर - औरंगाबाद कोरोना न्यूज

जिल्ह्यात रविवारी सकाळी 113 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 739 झाली आहे. यापैकी 1 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 143 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, आता 1 हजार 145 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोरोना औरंगाबाद न्यूज
कोरोना औरंगाबाद न्यूज

By

Published : Jun 14, 2020, 10:45 AM IST

औरंगाबाद -जिल्ह्यात रविवारी सकाळी 113 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 739 झाली आहे. यापैकी 1 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 143 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, आता 1 हजार 145 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, राजाबाजार (2), न्यू हनुमान नगर (2), बायजीपुरा(1), खोकडपुरा (2), बांबट नगर, बीड बायपास (2), साई नगर, एन सहा (2), राजमाता हाऊसिंग सोसायटी (1), माया नगर, एन दोन (3), संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), रशीदपुरा (2), यशोधरा कॉलनी (2), सिडको पोलिस स्टेशन परिसर (1), सिल्क मील कॉलनी (1), किराडपुरा (1), पीरबाजार (1), शहानूरवाडी (1), गजानन मंदिर परिसर, गारखेडा (2), अहिल्या नगर, मुकुंदवाडी (1), जहांगीर कॉलनी, हर्सुल (1), कैलास नगर (1), समर्थ नगर (1), छावणी परिसर (4), गौतम नगर (1), गुलमंडी (5), भाग्य नगर (1), गजानन नगर, गल्ली नं नऊ (4), मंजूरपुरा (1), मदनी चौक (1), रांजणगाव (1), बेगमपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), काली मस्जिद परिसर (1), क्रांती चौक परिसर (1), विश्रांती नगर (1), कन्नड (5), जिल्हा परिषद परिसर (4), देवगिरी नगर, सिडको वाळूज (1), बजाज नगर (15), राम नगर (1), देवगिरी कॉलनी सिडको (2), वडगाव कोल्हाटी (2), स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी (1), नक्षत्र वाडी (2), बकलवाल नगर, वाळूज (1), सलामपूर, पंढरपूर (11), वलदगाव (1), साई समृद्धी नगर कमलापूर (2), अज्वा नगर (1), फुले नगर, पंढरपूर (4), गणेश नगर, पंढरपूर (1), वाळूजगाव, ता. गंगापूर (1), शाहू नगर, सिल्लोड (1), मुस्तफा पार्क, वैजापूर (1), अन्य (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 38 स्त्री व 75 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णसंख्या वाढत असताना कोरोनाबाधित मृतांचा आकडाही वेगाने वाढत आहे. घाटी रुग्णालयात जिल्ह्यातील कन्नडगाव येथील 41 वर्षीय पुरुष, शहरातील खोकडपुरा येथील 78 वर्षीय रुग्ण, कैलास नगरातील 43 वर्षीय पुरुष, राम नगर येथील 70 वर्षीय स्त्री, सुभेदारी विश्राम गृह परिसरातील 42 वर्षीय स्त्री, रेहमानिया कॉलनीतील 50 वर्षीय स्त्री, संभाजी कॉलनीतील 54 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरातील एका खासगी रुग्णालयात ज्ञानेश्वर नगर, गारखेडा परिसर येथील 72 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 109, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 33, जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 143 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details