कोलकाता- मोहन बागान फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षक पदी स्पेनच्या ४७ वर्षीय किबू विकूना यांची निवड करण्यात आली. किबू यांची २०१९-२० सत्रासाठी त्यांची निवड झाली आहे.
स्पेनचे किबू विकूना मोहन बागानच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती - Mohun Bagan Sign Spanish Kibu Vicuna As Their New Headcoach
विकूना यांच्याकडे प्रशिक्षक पदाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी स्पेन आणि पोलंड या संघाला प्रशिक्षण दिले आहे.
विकूना यापूर्वी पोलंड येथी प्रथम डीविजन लीगमधील एकस्तराक्लासा संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. विकूना मोहन बागानचे प्रशिक्षक खालिद जमील यांची जागा घेतील.
विकूना यांच्याकडे प्रशिक्षक पदाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी स्पेन आणि पोलंड या संघाला प्रशिक्षण दिले आहे. मोहन बागानचे प्रमुख श्रीजॉय बोस आणि देवाशीष दत्ता यांनी विकूना यांना प्रशिक्षक म्हणून निवडल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही विकूना यांच्याशी संवाद साधला आहे. ते मोहन बागानचे प्रशिक्षक होण्यास उत्सुक आहेत.
TAGGED:
किबू विकूना