महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चंद्रपूरमधील दारूबंदी उठवा..! मनसेचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन - Mns chandrapur

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार आहेत. त्यांनी सुद्धा दारूबंदी उठविण्यावर जिल्ह्यातील निवडणूक जिंकली आहे. जिल्ह्यात दारू बंदीने महसूल बुडत आहे. बोगस दारूने आरोग्य बिघडत आहे. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दारू बंदी उठविण्याचा शब्द दिला होता. मात्र, ते पूर्ण न झाल्याने मनसे तर्फे निवेदन देण्यात आले.

Mns statement to wadettiwar
Mns statement to wadettiwar

By

Published : Jun 20, 2020, 7:00 PM IST

चिमूर (चंद्रपूर)- मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दारू बंदी उठविण्याच्या नावावर निवडणूक जिंकली. आता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार असून अजूनही दारू बंदी उठविली नाही. तेव्हा जिल्ह्यातील दारू बंदी उठवा, अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वड्डेटीवार हे चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील मागील लोकसभा निवडणुकीत दूध पाहिजे की दारू पाहिजे, यावर मत मागत काँग्रेसचे खासदार, आमदार निवडून आले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यात काँग्रेसचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आहेत. त्यांनी सुद्धा दारू बंदी उठविण्यावर जिल्ह्यातील निवडणूक जिंकली आहे. जिल्ह्यात दारू बंदीने महसूल बुडत आहे. बोगस दारू ने आरोग्य बिघडत आहे. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दारू बंदी उठविण्याचा शब्द दिला होता. मात्र, ते पूर्ण न झाल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची मागणी संदर्भात पालकमंत्री वड्डेटीवार याना निवेदन दिले.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष अमित उमरे, शहर अध्यक्ष नितीन लोणारे उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी येत्या सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्याचे आश्वासन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details