महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

लॉकडाऊन : स्कूलबस चालकांना आमदार राणा यांच्याकडून धान्य वाटप - MLA ravi Rana Amravati

शहरातील इतर नेते, लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा पुढाकार घेऊन स्कुलबस चालकांसह अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत करायला हवी, असे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. यावेळी युवास्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA ravi Rana grain distribution
MLA ravi Rana grain distribution

By

Published : Jul 8, 2020, 7:49 PM IST

अमरावती- कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यामुळे स्कूलबस चालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा वेळेस मदत म्हणून आमदार रवी राणा यांनी आज स्कूलबस चालकांना धान्य वितरित केले. यामुळे चालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे स्कूलबस चालकांवर सध्या आर्थिक संकट कोसळले आहे. स्कूलबस चालकांनी 15 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाने मदतीस्वरुपात 10 हजार रुपये महिना द्यावा अशी मागणी केली होती. स्कुलबस चालकांच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले असताना आज आमदार रवी राणा यांनी नेहरू मैदान येथे स्कुलबस चालकांना धन्य वितरित केले.

सध्या परिस्थितीत स्कूलबस तसेच ऑटोरिक्षा चालक, वाहन चालक यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. आशा प्रसंगात शाळांनी या स्कुलबस चालकांची मदत करायला हवी. शहरातील इतर नेते, लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा पुढाकार घेऊन स्कुलबस चालकांसह अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत करायला हवी, असे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. यावेळी युवास्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details