मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून गुरुवारी पुरुष आणि महिलांच्या विविध वयोगटांच्या निवड समित्या जाहीर केल्या. एमसीएने मुंबईच्या वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी फिरकीपटू मिलिंद रेगे यांची निवड केली आहे.
मिलिंद रेगे यांची मुंबई क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी - milind-rege-named-mca-chief-selector
रेगे यांच्यासोबत गुरू गुप्ते, श्रीधर मंडाले आणि संजय पाटील हे सदस्य आहेत.

मिलिंद रेगे
रेगे याची २०१९-२० या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. रेगे यांनी यापूर्वी मुंबई संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. रेगे यांच्यासोबत गुरू गुप्ते, श्रीधर मंडाले आणि संजय पाटील हे सदस्य आहेत.
मुंबईकडून खेळताना ७० वर्षीय रेगे यांनी ५२ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३६८३ धावांत १२६ बळी घेतले आहेत. महिलांच्या निवड समितीचे प्रमुखपद माजी क्रिकेटपटू वृंदा भगत यांच्याकडे देण्यात आले आहे.
TAGGED:
मिलिंद रेगे