सातारा- म्हसवड परिसरातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधित महिलेचा दुर्देवी अंत झाल्याने म्हसवड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी माणगंगेच्या नदीपात्रात सर्व सोपस्कर पार पाडीत मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले. यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे उपास्थित होत्या. त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांकडून शासकीय नियमांप्रमाणे महिलेचा अंत्यसंस्कार करून घेतला.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेवर म्हसवड पालिकेकडून अंत्यसंस्कार
मृत महिला ही 75 वर्षाची असून 5 दिवसांपूर्वी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला सातारा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा अंत झाला.
कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर दहिवडी व म्हसवड या ठिकाणीच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे यापूर्वीच शासनाने जाहीर केले असल्याने काल (4 जून) मृत कोरोनाबाधित महिला ही म्हसवड परिसरातील खडकी या गावातील रहिवासी असल्याने तिच्यावर म्हसवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मृत महिला ही 75 वर्षाची असून 5 दिवसांपूर्वी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला सातारा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा अंत झाला. खडकी हे गाव म्हसवड परिसरात असल्याने मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी म्हसवड नागरपरिषदेकडे देण्यात आली होती. त्यामुळे म्हसवड पालिकेने यापूर्वीच येथील स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.