कोलकाता - कोलकाता नाईटरायडर्स संघातील दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नोरत्जे दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या मॅट केली याला संघात सामील करुन घेतले आहे.
केकेआरच्या संघात बदल, 'हा' खेळाडू होणार संघात दाखल - matt kelly
केली पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा हा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज आतापर्यंत १६ प्रथम श्रेणीचे सामने आणि ५ लिस्ट 'ए' च्या सामन्यात खेळला आहे.
केली पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा हा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज आतापर्यंत १६ प्रथम श्रेणीचे सामने आणि ५ लिस्ट 'ए' च्या सामन्यात खेळला आहे. त्याने बिग बॅश लिगमध्ये पर्थ स्कोरचर्सकडून खेळताना १२ टी-२० सामन्यात १९ गडी बाद केले.
कोलकात्याचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी केली संघात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केकेआरचा संघ सध्या ६ सामन्यात ८ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.