मुंबई - संजू आणि उरी चित्रपटामुळे रातोरात बॉलिवूडमध्ये चमकलेला विकी कौशल लोकप्रियतेच्या कळसावर आहे. प्रत्येक डायरेक्टर, प्रोड्यूसर त्याला सिनेमात घेऊ इच्छितात. इतकेच नाही तर कॅटरिनालाही वाटते की, विकीसोबत ती पडद्यावर हॉट दिसेल. आता विकीच्या या हॉटनेसवर प्रिया बापटदेखील भाळली आहे.
कॅटरिनानंतर मराठमोळी प्रिया बापट झाली विकी कौशलची दिवानी - Priya Bapat
विकी कौशलचे फॅन्स वाढताना दिसताहेत. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. कॅटरिनाने ही इच्छा बोलून दाखवली होती. आता मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटलाही विकीसोबत काम करायचे आहे.
मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटात आणि असंख्य मराठी चित्रपटात काम केलेल्या प्रियाने नागेश कुकनूर यांच्या वेब सिरीजमध्येही काम केले आहे. प्रियाला विकी कौशलला भेटायचे आहे आणि त्याच्यासोबत तिला चित्रपटही करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की, मसान, गँग ऑफ वासेपूर आणि लव्ह पर स्वेअर फूट या चित्रपटातील विकीच्या भूमिकांवर प्रिया बापट फिदा झाली आहे. विकीच्या टॅलेंटवरच नाही तर त्याच्या पर्सनॅलिटीवरही प्रिया फिदा आहे.
कॅटरिना आणि प्रिया यांच्याशिवाय विकी कौशलसोबत आणखीनही काही मोठ्या अभिनेत्री आहेत की, ज्यांना विकीसोबत काम करण्याची इच्छा आहे.