इस्लामाबाद- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्याला ते विशेष अतिथी म्हणून नाही, तर सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेत उपस्थित असणार आहेत, असे ते म्हणाले. 9 नोव्हेंबरला पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करणार असल्याने मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
'माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटन सोहळ्याला येण्यासाठी निमंत्रण दिल्याचे मेहमूद कुरेशी यांनी सांगितले. त्यानंतर सिंग यांनी उद्धाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून नाही, तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून येणार असल्याचे मान्य केले. याबद्दल कुरेशी यांनी त्यांचे आभार मानले. मनमोहन सिंग सामान्य व्यक्ती म्हणून जरी कार्यक्रमाला येणार असले, तरी आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'पाकिस्तान येत्या ९ नोव्हेंबरला कर्तारपूर मार्गिकेचे करणार उद्घाटन'