महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

'झाकीर नाईकला स्वीकारण्यास कोणताच देश तयार नाही, भारत त्याच्यासाठी असुरक्षित'

हा वादग्रस्त फरार धर्मगुरू भारतीय लोकांपासून सुरक्षित नाही, असे 95 वर्षीय महाथिर यांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही त्याला अशा देशात पाठवू इच्छितो, जेथे आम्हाला तो सुरक्षित आहे असे वाटेल, असे ते पुढे म्हणाले. दुर्दैवाने, कोणताच देश त्याला स्वीकारण्यास तयार नाही, असे त्यांनी म्हटले.

वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक
वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक

By

Published : Aug 8, 2020, 5:12 PM IST

क्वालालंपूर - मलेशिया त्यांच्या देशातील वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याला पाठवण्यासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांचा शोध करत आहे. मात्र, या वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरुला स्वीकारण्यास कोणताही देश तयार नाही असे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटले आहे.

झाकिर नाईक या 54 वर्षे कट्टरपंथी इस्लामिक धर्मगुरुने 2016 मध्ये भारत सोडला आणि तो मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोकसंख्या असलेल्या मलेशियामध्ये गेला. तेथे तेव्हाचे मलेशियन पंतप्रधान महाथिर यांनी त्याला कायमस्वरूपी आसरा दिला. अवैध संपत्ती आणि द्वेषपूर्ण व स्फोटक कट्टरतावादी भाषणे प्रकरणी हा धर्मगुरू भारतीय अन्वेषण अधिकाऱ्यांना हवा आहे.

हा वादग्रस्त फरार धर्मगुरू भारतीय लोकांपासून सुरक्षित नाही, असे 95 वर्षीय महाथिर यांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही त्याला अशा देशात पाठवू इच्छितो, जेथे आम्हाला तो सुरक्षित आहे असे वाटेल, असे ते पुढे म्हणाले. दुर्दैवाने, कोणताच देश त्याला स्वीकारण्यास तयार नाही, असे त्यांनी म्हटले.

मात्र, पुन्हा पंतप्रधान झाल्यास नाईक याला मलेशिया भारताकडे सोपवेल का, असे विचारले असता त्यांनी याला स्पष्ट नकार दिला.

गेल्या वर्षी मलेशियातील हिंदू आणि चिनी लोकांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतामध्ये नाईक याच्या सार्वजनिक उपक्रमांवर बंदी घातली.

महाथिर पंतप्रधान असताना त्यांची सप्टेंबर 2019 मध्ये रशियामध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी द्विपक्षीय भेट झाली होती. या भेटीत मोदींनी त्यांना नाईक याचे भारताला प्रत्यर्पण करण्याची विनंती केली नव्हती, असे महाथिर म्हणाले. त्यांचा हा दावा या फरार धर्मगुरूच्या प्रत्यर्पणाची मागणी करणार्‍या भारताने जोरदारपणे खोडून काढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details