महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता जपणार! राज ठाकरेंच्या ट्विटला स्टॅलिन यांचे उत्तर - एम के स्टॅलिन राज ठाकरे बातमी

भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही राहाल, अशी आशा व्यक्त करतो, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले होते.

M k stalin
एम.के. स्टॅलिन

By

Published : May 3, 2021, 12:30 PM IST

मुंबई -भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणं सुरूच राहिल, अशी प्रतिक्रिया देत डीएमकेचे एम.के. स्टॅलिन यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पश्चिम बंगालमधील आणि तामिळनाडूमधील विजयानंतर राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे स्टॅलिन यांचे अभिनंदन केले होते.

स्टॅलिन यांना शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी, “तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हिच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन”,असं ट्विट केले होते. या ट्विट वर रिट्विट करत “राज ठाकरे… तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे…हो, माझ्याकडून भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणं सुरूच राहिल”, अशी ग्वाही स्टॅलिन यांनी दिली आहे आणि राज यांचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details