यवतमाळ- प्रहार जनशक्ती पक्षाकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविलेल्या वैशाली सुधाकर येडे यांनी आज त्यांच्या कळंब तालुक्यातील राजूर येथील अंगणवाडीमध्ये रुजू होऊन कामास सुरुवात केली आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या येथे कार्यरत होत्या.
दरम्यान, प्रहारकडून शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती. वैशाली येडे या प्रहारकडून उमेदवारी मिळाल्यावर विना मानधन रजेवर होत्या. या काळात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्यांनी शिट्टी या चिंन्हावर निवडणूक लढवली होती. यांच्या या उमेदवारीमुळे युती-आघाडीच्या उमेदवार यांचे विजयाचे समीकरण बिघडवले आहे.