बीडसह 5 तालुके पुन्हा लॉकडाऊन; ठिक-ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात - Corona community spread
जिल्ह्यात 17 ठिकाणे कंटेनमेंट केलेली आहेत. शिवाय, बुधवारपासून जिल्ह्यातील बीड शहरासह माजलगाव, केज, अंबाजोगाई, आष्टी, परळी या तालुक्यामध्ये दहा दिवस लॉक डाऊन लावले आहेत. सामूहिक संसर्ग होत असल्यामुळे कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.
बीड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजारांच्या पुढे गेली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या सामूहिक संसर्गाचे संक्रमण तोडण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा प्रशासनाने 12 ते 21 ऑगस्टदरम्यान लॉक डाऊन सुरू केले आहे. बुधवारी सकाळपासूनच बीड शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या साडे बाराशे रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, 900 पेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात 17 ठिकाणे कंटेनमेंट केलेली आहेत. शिवाय, बुधवारपासून जिल्ह्यातील बीड शहरासह माजलगाव, केज, अंबाजोगाई, आष्टी, परळी या तालुक्यामध्ये दहा दिवस लॉक डाऊन लावले आहेत. आज घडीला जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार 100 पेक्षा अधिक आहे. सामूहिक संसर्ग होत असल्यामुळे कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.
बुधवारी बीड शहरातील सुभाष रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड या भागात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी 21 ऑगस्टपर्यंत घराच्या बाहेर निघू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.