महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

महाराष्ट्राला आज थोडासा दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या 5 हजाराच्या खाली - Corona patient maharashtra

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 नमुने पॉझिटिव्ह (18.7 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 78 हजार 33 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Minister Rajesh tope
Minister Rajesh tope

By

Published : Jun 30, 2020, 10:57 PM IST

मुंबई- सलग 4 दिवस 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवल्यानंतर राज्यात आज कोरोनाच्या संख्येत घट होऊन 4 हजार 878 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 75 हजार 979 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज 1 हजार 951 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 90 हजार 911 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.2 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 नमुने पॉझिटिव्ह (18.7 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 78 हजार 33 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 245 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद असून. यापैकी 95 मृत्यू मागील 48 तासांमधील, तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे.

मागील 48 तासात झालेले 95 मृत्यू हे मुंबई मनपा-36, ठाणे-3, ठाणे मनपा-9, कल्याण-डोंबिवली मनपा-4, भिवंडी निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-2, नाशिक-2, नाशिक मनपा-1, जळगाव-5, पुणे-1, पुणे मनपा-5, पिंपरी चिंचवड मनपा-3, सोलापूर मनपा-2, कोल्हापूर-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-11, लातूर-1,अकोला-2, अकोला मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (77,658), बरे झालेले रुग्ण- (44,170), मृत्यू- (4,556), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(8), ॲक्टिव्ह रुग्ण- (28,924).

ठाणे: बाधित रुग्ण- (37,630), बरे झालेले रुग्ण- (15,042), मृत्यू- (956), इतर कारणांमुळे झालेला मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (21,631)

पालघर: बाधित रुग्ण- (5,858), बरे झालेले रुग्ण- (2,621), मृत्यू- (108), इतर कारणांमुळे झालेला मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (3,129)

रायगड: बाधित रुग्ण- (4254), बरे झालेले रुग्ण- (2127), मृत्यू- (102), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (2023)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (595), बरे झालेले रुग्ण- (435), मृत्यू- (27), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (133)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (219), बरे झालेले रुग्ण- (154), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (61)

पुणे: बाधित रुग्ण- (22327), बरे झालेले रुग्ण- (11270), मृत्यू- (752), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (10305)

सातारा: बाधित रुग्ण- (1076), बरे झालेले रुग्ण- (724), मृत्यू- (43), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (307)

सांगली: बाधित रुग्ण- (376), बरे झालेले रुग्ण- (217), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (148)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (846), बरे झालेले रुग्ण- (711), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (124)

सोलापूर: बाधित रुग्ण- (2651), बरे झालेले रुग्ण- (1473), मृत्यू- (265), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (1), ॲक्टिव्ह रुग्ण- (912)

नाशिक: बाधित रुग्ण- (4226), बरे झालेले रुग्ण- (2232), मृत्यू- (222), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (1772)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (431), बरे झालेले रुग्ण- (273), मृत्यू- (14), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (144)

जळगाव: बाधित रुग्ण- (3415), बरे झालेले रुग्ण- (1916), मृत्यू- (234), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (1265)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (175), बरे झालेले रुग्ण- (72), मृत्यू- (7), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (96)

धुळे: बाधित रुग्ण- (1094), बरे झालेले रुग्ण- (544), मृत्यू- (54), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (494)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (5328), बरे झालेले रुग्ण- (2349), मृत्यू- (256), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (2723)

जालना: बाधित रुग्ण- (552), बरे झालेले रुग्ण- (334), मृत्यू- (14), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (204)

बीड: बाधित रुग्ण- (118), बरे झालेले रुग्ण- (91), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (24)

लातूर: बाधित रुग्ण- (331), बरे झालेले रुग्ण- (191), मृत्यू- (18), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (112)

परभणी: बाधित रुग्ण- (99), बरे झालेले रुग्ण- (76), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (19)

हिंगोली: बाधित रुग्ण- (270), बरे झालेले रुग्ण- (241), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

नांदेड: बाधित रुग्ण- (344), बरे झालेले रुग्ण (231), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (100)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (215), बरे झालेले रुग्ण- (169), मृत्यू- (10), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (36)

अमरावती: बाधित रुग्ण- (566), बरे झालेले रुग्ण- (411), मृत्यू- (28), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (124)

अकोला: बाधित रुग्ण- (1536), बरे झालेले रुग्ण- (973), मृत्यू- (76), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (486)

वाशिम: बाधित रुग्ण- (102), बरे झालेले रुग्ण- (71), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (28)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (245), बरे झालेले रुग्ण- (145), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (88)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (285), बरे झालेले रुग्ण- (203), मृत्यू- (10), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (72)

नागपूर: बाधित रुग्ण- (1468), बरे झालेले रुग्ण- (1144), मृत्यू- (15), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (309)

वर्धा: बाधित रुग्ण- (19), बरे झालेले रुग्ण- (12), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (6)

भंडारा: बाधीत रुग्ण- (80), बरे झालेले रुग्ण- (71), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (9)

गोंदिया: बाधित रुग्ण- (123), बरे झालेले रुग्ण- (102), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (20)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (94), बरे झालेले रुग्ण- (55), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (39)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (66), बरे झालेले रुग्ण- (58), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (7)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (89), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (66)

एकूण: बाधित रुग्ण-(174761), बरे झालेले रुग्ण-(90911), मृत्यू- (7855), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(16),ॲक्टिव्ह रुग्ण-(75979)

(टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या 245 मृत्यूंपैकी 95 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत आणि 150 मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 57, ठाणे मनपा, 15, भिवंडी -42, कल्याण डोंबिवली-2, मीरा भाईंदर -4, ठाणे -3, पालघर -5, पनवेल -7, सोलापूर -6, औरंगाबाद -4, पुणे -3, नाशिक -1 आणि जळगाव -1 यांचा समावेश आहे. हे 150 मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय.सी.एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ABOUT THE AUTHOR

...view details