महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अडवाणींचा लेटर बॉम्ब, म्हणाले भाजपशी राजकीय असहमत असणारे देशद्रोही नाहीत

भारतीय जनता पक्ष ६ एप्रिलला स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी गांधीनगर येथील जनतेचे विषेश आभार मानले आहेत. अडवाणी हे गांधीनगर लोकसभा मतदार संघातून तब्बल ६ वेळा निवडून गेले आहेत. यावेळी या जागेवरून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहेत.

By

Published : Apr 4, 2019, 9:49 PM IST

लालकृष्ण अडवाणी

नवी दिल्ली - भाजपचा स्थापना दिवस आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉग लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी लोकशाही मूल्य आणि राष्ट्रवादावर महत्वाचे विधान केले आहे. तर, जे लोक आमच्या राजकीय भूमिकेशी सहमत नाहीत. त्यांना आम्ही कधीच देशद्रोही म्हणत नाही, असे स्पष्टीकरणही अडवाणी यांनी दिले आहे.

भारतीय जनता पक्ष ६ एप्रिलला स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी गांधीनगर येथील जनतेचे विषेश आभार मानले आहेत. अडवाणी हे गांधीनगर लोकसभा मतदार संघातून तब्बल ६ वेळा निवडून गेले आहेत. यावेळी या जागेवरून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहेत.

आपण वयाच्या १४व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. तेव्हा आपण ७० दशकांपर्यंत प्रथम भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून राजकारणाशी जुळलेले होतो. यावेळी मी अनेक दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आलो. त्यामध्ये दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि अनेक नेत्यांचा सहवास आपणाला लाभला, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.

राजकारणात असताना आपण राष्ट्र प्रथम, पक्ष दुसरा आणि स्वतःला शेवटी प्राधान्य दिले आहे. या सर्व मुल्यांसाठी आपण पक्षाच्या मुल्यांशी जुळून राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला, असेही अडवाणी यांनी म्हटले आहे.

लोकशाहीचा सुगंध विविधतेमध्ये आहे. भाजपने आपल्या राजकीय विरोधकांना आरंभीपासूनच म्हणून कधीच संबोधले नाही. तसेच राष्ट्रवादाबद्दलही आम्ही समजतो. राजकीय दृष्ट्या आमच्याशी सहमत नसलेल्यांना आम्ही कधीच राष्ट्रविरोधी संबोधले नाही, असे स्पष्टीकरणही अडवाणी यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details