महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 'या' कारणानं रॉबिन उथप्पाने तोंडाला लावले मास्क - रॉबिन उथप्पा

विशेष म्हणजे संघातील इतर कोणतेच खेळाडू तोंडाला मास्क लावून उतरले नव्हते.

कोलकात्याचा संघ

By

Published : Apr 7, 2019, 11:25 PM IST

जयपूर - आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि राजस्थान यांच्यात जयपूर येथील सवाई मान सिंह स्टेडियमवर सामना सुरू आहे. यावेळी कोलकाता संघातील प्रमुख खेळाडू रॉबिन उथप्पाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. क्षेत्ररक्षण करतेवेळी तो तोंडाला मास्क लावून उतरला होता.

विशेष म्हणजे संघातील इतर कोणतेच खेळाडू तोंडाला मास्क लावून उतरले नव्हते. या सामन्यापूर्वी जयपूरमध्ये वेगवान वारे सुटले होते. त्यामुळे सर्वत्र धुळ पसरली होती. वेगावान वाऱ्यामुळे खेळाडूंचे किटदेखील इतरत्र विखुरले होते. या धुळीचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्याने मास्क लावले होते.

तसेच ग्राउंड स्टाफने मैदानावरील पिचला कव्हरने झापले होते. याचा सामन्यावर कोणताही परिणार झाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details