नंदुरबार - लॉकडाऊनच्या काळात आदिवासी भागातील नागरिकांना मदत मिळावी, म्हणून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी खावटी अनुदानाची घोषणा केली. या योजनेचा फायदा राज्यातील लाखो आदिवासी कुटुंबाना मिळणार होता. घोषणा होऊन एक महिना उलटा तरीही योजना अजून गुलदस्त्यात असल्याचा आरोप नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी केला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजनेवर खा. डॉ हीना गावित यांचे प्रश्नचिन्ह
आदिवासी बांधवांची मंत्र्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. खावटी अनुदानाबाबत ना. पाडवी यांनी लवकर खुलासा करून त्या अनुदानापासून आदिवासी बांधवांना वंचित ठेवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या काळात लाखो आदिवासी बांधवांच्या हातातील काम गेले. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले होते. यासाठी खावटी अनुदान योजनेची घोषणा करण्यात आली. राज्यातील आदिवासी बांधव दुर्गम भागात राहत असतात. त्यांच्यापर्यंत खावटी अनुदान पोचविण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी घोषित केलेली खावटी अनुदान योजना कधी सुरु होणार आहे, याचा खुलासा करावा. त्याचसोबत घोषणा करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नंदुरबारच्या खासदार डॉ. गावित यांनी केला आहे.
एकंदरितच, आदिवासी बांधवांची मंत्र्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. खावटी अनुदानाबाबत ना. पाडवी यांनी लवकर खुलासा करून त्या अनुदानापासून आदिवासी बांधवांना वंचित ठेवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.