मुंबई - आयपीएलच्या सामन्यात सोमवारी मुंबईने विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला ५ गडी राखून पाणी पाजले. या सामन्यात एक क्षण असा आला की, ज्याने सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवला. तो म्हणजे जसप्रीत बुमराहने टाकलेल्या एका घातक चेंडूने. यात आरसीबीचा खेळाडू एबी डिव्हिलियर्स थोडक्यात बचावला.
'त्या' चेंडूने सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवला, हा खेळाडू थोडक्यात बचावला - undefined
५ वर्षांपूवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ह्यूजच्या अपघाती निधनानंतर हेल्मेटच्या मागे गार्ड बसवले जाऊ लागले आहेत. ज्यामुळे मानेजवळील भागाला संरक्षण मिळते.
जसप्रीत बुमराह सामन्यातील १९ व्या षटकातील पाचवा चेंडू बाउंसर टाकला. या चेंडूवर एक जोरदार फटका मारण्याचा डिव्हिलियर्सने प्रयत्न केला. मात्र त्याचा तो चुकला. त्यामुळे चेंडू त्याच्या हेल्मेटच्या अगदी मागच्या बाजूला लागला. यामुळे अक्षरश: प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यावेळी सगळेच खेळाडू डिव्हिलियर्सच्या जवळ गेले आणि ते त्याची विचारपूस करू लागले.
कर्णधार रोहित शर्मा तात्काळ डिव्हिलियर्सकडे धावत गेला आणि त्याची विचारपूस केली. सुदैवाने बुमराहने टाकलेला चेंडू हेल्मेटच्या अगदी खालच्या बाजूला बसला होता. त्यामुळे डिव्हिलियर्सला कोणतीही इजा झाली नाही. एबीने जे हेल्मेट घातले होते त्याच्या मागील बाजूस दोन गार्ड बसवण्यात आलेले नव्हते. ५ वर्षांपूवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ह्यूजच्या अपघाती निधनानंतर हेल्मेटच्या मागे गार्ड बसवले जाऊ लागले आहेत. ज्यामुळे मानेजवळील भागाला संरक्षण मिळते.