नवी दिल्ली : रशिया-भारत-चीन या तीन देशांमध्ये परराष्ट्र मंत्री स्तरावरील आरआयसी बैठक आज(मंगळवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. भारत चीन सीमावाद पेटलेला असताना दोन्ही नेते प्रथमच आमनेसामने आले. आंतरराष्ट्रीय संबध जोपासताना कोणती मुल्ये पाळायला हवीत, याचा पाढा भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वाचून दाखवला. नुकतेच चीनने आक्रमक धोरण स्वीकारत सर्वच शेजारी देशांबरोबरच्या वाद वाढवला आहे, त्यावर बोट ठेवत जयशंकर यांनी चीनचे कान टोचले.
आंतरराष्ट्रीय संबध जोपासताना मुल्ये महत्त्वाची; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनला सुनावले
रशिया-भारत-चीन या तीन देशांमध्ये परराष्ट्र मंत्री स्तरावरी आरआयसी बैठक आज(मंगळवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. भारत चीन सीमावाद पेटलेला असताना दोन्ही नेते प्रथमच आमनेसामने आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमधील हितसंबध राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या बैठकीला चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई उपस्थित होते. 15 जूनला भारत आणि चीनच्या लष्करामध्ये झालेल्या हाणामारीत 20 भारतीय सैनिक शहिद झाले, अशा तणावपूर्ण वातावरणात ही चर्चा झाली. भारतीय सैनिकांवर पुर्वनियोजितपणे हल्ला करण्यात आल्याचा आरोप नुकताच जयशंकर यांनी वँग यांच्याशी फोनवर बोलताना केला होता.
बदलत्या परिस्थितीनूसार संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा करण्याची गरज असून त्यामुळे जगाची खरी परिस्थिती दिसून येईल, असे जयशंकर म्हणाले. ही विशेष बैठक आंतरराष्ट्रीय संबध पाळताना सिद्धांतावर भारताचा असलेला विश्वास दाखवते. आंतरराष्ट्रीय संबंध राखताना घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन तसेच बहुपक्षीय हितसंबध राखल्याने मजबूत आंतरराष्ट्रीय संबध तयार होतील, असे जयशंकर म्हणाले.