चेन्नई - आयपीएलमध्ये बुधावारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीचा ८० धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, या सामन्यात आम्हाला कंगिसो रबाडाची कमतरता जाणवली. कमरेच्या दुखण्याने त्याला विश्रांती देण्यात आली होती. डेथ ओव्हरमध्ये तो चांगली गोलंदाजी करतो.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रबाडाचा कमतरता जाणवली - अय्यर - iyer said they missed someone like kagiso rabada in death over
दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर चेन्नई पहिल्या स्थानावर आहे.
श्रेयस अय्यर पुढे बोलताना म्हणाला, रबाडाच्या जागी आम्ही ट्रेंट बोल्टला संधी दिली होती. पण तो खूपच महागडा ठरला. त्याने ९.२५ च्या सरासरीने ३७ धावा दिल्या. त्याच्या शेवटच्या षटकात महेंद्र सिंह धोनीने २० धावा कुटल्या. जर रबाडा या जागी असला असता तर खूपच फरक जाणवला असता. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये जो विजय मिळविला त्या विजयाचा खरा हिरो रबाडा ठरला होता.
पुढे बोलताना श्रेयस म्हणाला, की आम्ही नियोजनानुसार खेळ केला नाही. आमच्या क्षमतेवर संशय नाही पण आम्ही स्मार्ट क्रिकेट खेळण्यावर भर दिला. पुढील सामन्यात आम्ही सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न करु असेही अय्यर म्हणाला. बुधावारी झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ ९९ धावा करु शकला. दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर चेन्नई पहिल्या स्थानावर आहे.
TAGGED:
अय्यर