महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चीनमुळं उभे राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्याची ही वेळ - माईक पोम्पेओ - माईक पोम्पेओ

जगभरातील लोकशाही आणि स्वातंत्र्यवादी देशांनी एकत्र येऊन चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आव्हानांचा सामना करण्याची ही वेळ आहे, असे पॉम्पेओ म्हणाले.

माईक पोम्पेओ
माईक पोम्पेओ

By

Published : Jul 17, 2020, 5:35 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - चिनी कम्युनिस्ट पक्षामुळे उभे राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्याची वेळ जगावर आली आहे. चीनच्या धोक्याबाबत अमेरिका अनेक दिवस गाफिल राहिला. मात्र, आता चीनचा सामना करण्याची वेळ आली आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ म्हणाले. मागील काही दिवसांपासून पोम्पेओ चीनच्या आक्रमक धोरणावर जोरदार हल्ला करत आहेत. भारताने 59 चिनी अ‌ॅप्सवर बंदी घातल्याच्या निर्णयाचेही पोम्पओ यांनी स्वागत केले होते.

एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीत कोरोनाचा प्रसार होतो. हे चिनी सरकारला माहित होते. मात्र, ही माहिती त्यांनी जगाला उशिरा सांगितली. फक्त दक्षिण आशियायी देशच नाही तर, संपूर्ण आशिया आणि युरोपातील देशांना चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आहे. अमेरिका अनेक वर्ष चीनच्या धोक्यापासून गाफिल राहीला, असे पोम्पेओ म्हणाले.

जगभरातील लोकशाही आणि स्वातंत्र्यवादी देशांनी एकत्र येऊन चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आव्हानांचा सामना करण्याची ही वेळ आहे. मागच्या 40 वर्षांपासून अमेरिकेच्या अनेक सरकारांनी देशाला चीनच्या पायदळी तुडवू दिले. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे थांबविले. चीन ज्या पद्धतीने अमेरिकेबरोबर व्यापार करेल, त्या पद्धतीनेच आम्ही व्यापारी संबंध ठेऊ, असे ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनाही चीनबरोबर सामील होती. जगाला असलेला धोका ते नाकारत राहिले. वुहानमधून सुरु झालेल्या कोरोनामुळे जगभरातील लाखो लोक मृत्यूमुखी पडले तर, कोट्यवधी पैसे खर्च झाले. याला चीन जबाबदार आहे. हे भयंकर संकट चीन टाळू शकला असता. चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे याचे उत्तरदायित्त्व जाते, असे पोम्पओ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details