हैदराबाद- आयपीएल २०१९ चा किताब जिंकण्यासाठी मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढत रंगणार आहे. दोन्ही संघाना किताबाचा चौकार मारण्याची संधी आहे. हा किताब जिंकणाऱ्या संघावर पैशाचा पाऊस पडणार आहे.
आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या संघास २० कोटी रुपये मिळणार आहे. तर उपविजेत्या संघास १२.५ कोटी रुपये मिळणार आहे. दुसरा क्वॉलिफायर सामना हारणारा संघ दिल्ली कॅपिटल्स संघास १०.५ कोटी रुपये मिळतील. चौथ्या क्रमांकाचा हैदराबादच्या संघास ८.५ कोटी रुपये मिळणार आहेत.