दिल्ली - अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्स मंगळवारी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी हजेरी लावला होता. ऑलिम्पिंकमध्ये २३ सुवर्णपदक विजेता फेल्प्स प्रचार कार्यक्रमासंबंधी दिल्ली येथे आला आहे. त्याने त्याचा संध्याकाळचा वेळ क्रिकेट पाहण्यासाठी दिला आणि आयपीएलच्या सामन्याचा आनंद घेतला.
अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स आयपीएल पाहण्यास लावली हजेरी - अमेरिकेचा जलतरणपटू
अमेरिकेचा हा ३३ वर्षीय जलतरणपटू पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे.
![अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स आयपीएल पाहण्यास लावली हजेरी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2819886-8-36d4241b-90da-4a9b-851c-a3c81818b5f2.jpg)
मायकेल फेल्प्स
बीसीसीआयचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने माहिती देताना सांगितले, की जलतरणपटू मायकेल फेल्प्सने कधीच क्रिकेट पाहिले नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाचा पाहुणा बनून तो स्टेडियमवर उपस्थित होता. भारतातील सर्वात लोकप्रिय लीग पाहण्याची संधी त्याला मिळाली.
अमेरिकेचा हा ३३ वर्षीय जलतरणपटू पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे. सामना सुरु झाल्यावर काही वेळ त्याने सामना पाहण्यासाठी दिला. त्यानंतर तो निघून गेला.