चेन्नई - चेन्नई सुपर किंग्ज हा इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाचे भारतात नव्हे जगभारात चाहते आहेत. या फॅन्समध्ये केवळ युवावर्ग नाही, तर वृद्धासोबत लहान मुलेदेखील आहे. याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
आज मी चेन्नईचा फॅन, उद्या याच संघात खेळताना दिसेल; छोट्या फॅनचा फोटो व्हायरल - चेन्नईचा छोटा फॅन
मागील सामन्यातही एक वृद्ध महिला स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आली होती. तिने तिच्या हातातील बॅनरवर लिहिले होते की, मी येथे धोनीला पाहण्यासाठी आले आहे. त्यानंतर धोनीने त्या वृद्ध महिलेची भेट घेतली आणि तिच्यासोबत सेल्फीही काढला. तसेच तिला ऑटोग्राफही दिला.

मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात सामना झाला. हा सामना चेन्नईने ७ गडी राखून जिंकला. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. स्टेडियममध्ये हातात बॅनर घेऊन थांबलेला एक छोटा चाहता कॅमेरॅत कैद झाला आहे. त्याच्या पोस्टरमध्ये लिहिले होते की, आज मी सीएसकेचा फॅन आहे, उद्या याच संघात खेळताना दिसेल. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आयपीएलने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मागील सामन्यातही एक वृद्ध महिला स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आली होती. तिने तिच्या हातातील बॅनरवर लिहिले होते की, मी येथे धोनीला पाहण्यासाठी आले आहे. त्यानंतर धोनीने त्या वृद्ध महिलेची भेट घेतली आणि तिच्यासोबत सेल्फीही काढला. तसेच तिला ऑटोग्राफही दिला.
TAGGED:
चेन्नईचा छोटा फॅन