मोहाली- भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटने घाम फोडणारा ख्रिस गेल हा बिनधास्त आणि विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. भर मैदानात त्याने डान्स करुन यापूर्वी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकताच त्याचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यातून दिसून येते की, गेल हा डान्स करण्यात ही माहीर आहे.
'यूनिव्हर्सल बॉस'चा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल - undefined
आयपीएलमध्ये राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी बसमधून उतरताना फॅन्सने ख्रिस गेलला ढोल-ताशाच्या सोबत घेरले.

ख्रिस गेल
आयपीएलमध्ये राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी बसमधून उतरताना फॅन्सने ख्रिस गेलला ढोल-ताशाच्या सोबत घेरले. त्यावेळी तो स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकला नाही. याचवेळी गेलने त्याची टोपी काढून फॅन्सच्या डोक्यावर ठेवली. आयपीएलच्या अधिकृत ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.