बंगळुरू - सततच्या पराभवानंतर विजयी मार्गावर परतणाऱ्या विराटसेनेसाठी वाईट बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाल्याने आयपीएलमधून बाहेर पडला आहे. नाथन कुल्टर-नाइल याच्या जागी त्याला संधी देण्यात आली होती. आयपीएलमधील ८ पैकी ७ सामने हरल्यानंतर बंगळुरूने स्टेनला संघात घेतले होते.
स्टेनच्या संघात परतण्याने बंगळुरूने २ सामनेही जिंकले आहे. त्याने २ सामन्यांत ४ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ३५ वर्षीय स्टेन २०१६ पासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर जवळ जवळ २ वर्ष तो संघाबाहेर होता. २०१८ आणि २०१९ साली आयपीएलमध्ये त्याला कोणताच खरेदीदार मिळाला नाही.