महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

करमाळा तालुक्यातील दोघा पोलीस उपनिरीक्षकांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर - पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर न्यूज

करमाळा तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सुरवसे व पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. या दोघांना हे पदक मिळाल्याने त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. दुर्गम व नक्षली भागात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

करमाळा पोलीस न्यूज
करमाळा पोलीस न्यूज

By

Published : Jun 13, 2020, 2:38 PM IST

करमाळा (सोलापूर) - नक्षली, दुर्गम भागात केलेल्या कार्यामुळे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर केलेले आहेत. यात करमाळा तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सुरवसे व पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांचा समावेश आहे. या दोघांना हे पदक मिळाल्याने त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. दुर्गम व नक्षली भागात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

करमाळा तालुक्यातील कोंढेज या गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सुरवसे यांनी २०१३ च्या सरळ सेवा परीक्षेत यश संपादन करून पोलीस सेवेत प्रवेश केला. एक वर्षाचे नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नेमणूक गडचिरोली विशेष अभियानपथक एटापल्ली तालुक्यातील, भामरागड एरिया या दुर्गम भागात झाली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम पाहिले.

तिथे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची, राबविलेल्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन केंद्र सरकार कडून आंतरिक सुरक्षा सेवा पदकासाठी निवड केली आहे. सुरवसे यांना याअगोदर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, खडतर सेवा पदक प्राप्त झालेली आहेत. गडचिरोली नंतर ननवरे हे लोणी काळभोर या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. सध्याच्या कोविड-१९ च्या काळातही ते सेवा चोख बजावत आहेत.

‘गडचिरोली ही पोस्टिंग नसून संधी आहे. गोरगरीब जनतेला सेवा देण्याची त्यावेळी आम्हाला आमचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहिलो आणि पुढे सर्व होत गेलs. हे पदक म्हणजे आम्ही तिथे गोरगरीब जनतेची केलेली सेवा त्यांना केलेली मदत ही या कामाची पावती आहे,’ असे उपनिरीक्षक ननवरे तेथील अनुभवाबद्दल बोलताना म्हणाले.

मूळचे सातोली (ता. करमाळा) येथील पोलीस उपनिरीक्षक शंकर महादेव मुटेकर हे बॅच ११० चे असून प्रशिक्षणानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाणे या भागात पोस्टिंग झाली. तिथे त्यांनी सन २०१५ ते २०१९ याकाळात काम कामकाज पाहिले. तिथे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयतर्फे कडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक साठी निवड केली आहे. चंद्रपूर नंतर ते महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूर जि. पुणे येथे कार्यरत आहेत.या दोघांनाही आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details