नवी दिल्ली - भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये काही धमाकेदार खेळी केल्या आहेत. त्याच्या या बहारदार कामगिरीने अनेक चाहते त्याचे दिवाने झाले आहेत. सध्या पंत तुफान फॉर्मात आहे. तरीही त्याला भारतीय विश्वकरंडक संघात स्थान देण्यात आले नाही. या विश्वकरंडकात भारतीय संघाला त्याची कमतरता जाणवेल, असे वक्तव्य माजी कर्णधार सौरव गांगुलीने केले आहे.
भारतीय संघाला विश्वकरंडकात ऋषभ पंतची उणीव भासेल - गांगुली - india-cricket-team-will-surely-missed-rishabh-pant-in-upcoming-icc-cricket-world-cup
२१ वर्षीय फलंदाज ऋषभ पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला पसंती देण्यात आली. त्याने आयपीएलच्या १६ सामन्यात ४८८ धावा केल्या आहेत.
![भारतीय संघाला विश्वकरंडकात ऋषभ पंतची उणीव भासेल - गांगुली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3275187-446-3275187-1557822521998.jpg)
इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे. २१ वर्षीय फलंदाज ऋषभ पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला पसंती देण्यात आली. त्याने आयपीएलच्या १६ सामन्यात ४८८ धावा केल्या आहेत. विश्वकरंडकात भारताची पहिली लढत ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या केदार जाधव दुखापतीने त्रस्त आहे. त्याची दुखापत बरी न झाल्यास त्याच्याऐवजी पंतला संधी मिळू शकते.
गांगुली पुढे बोलताना म्हणाला, की चेन्नईचा कर्णधार एम.एस धोनी आणि रोहित शर्मा आयपीएलचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघ दर्जेदार आहेत. आम्ही चांगला खेळ केला पण अंतिमफेरीपर्यंत केवळ दोनच संघ पोहचू शकतात. आयपीएलचा सीझन संपलेला आहे, त्यामुळे आम्ही पुढचा विचार करणार नाही, असे गांगुलीने म्हटले. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेंटार म्हणून काम पाहत आहे.
TAGGED:
ऋषभ पंत