नांदेड : जिल्ह्यात आज (12 एप्रिल) 5 हजार 967 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 798 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 हजार 41, तर अँटिजेन तपासणीद्वारे 757 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 59 हजार 408 एवढी झाली आहे. यातील 45 हजार 191 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 12 हजार 859 रुग्ण उपचार घेत असून 188 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 8 ते 11 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 103 एवढी झाली आहे.
जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 80 हजार 558
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 13 हजार 684
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 59 हजार 408
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 45 हजार 191