महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नांदेडमध्ये 19 लाखांचा अवैध गुटखा जप्त, देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - गुटखा जप्त nanded

या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये 40 गोण्या गुटखा जप्त केला आहे. प्रत्येक गोणीमध्ये 6 छोटया बॅग, बॅगमध्ये 54 पॅकेट असे एकत्रीत 12 हजार 960 पॅकेट किंमत एकूण 19 लाख 44 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

nanded news
nanded crime news

By

Published : Jun 12, 2020, 9:08 PM IST

नांदेड -जिल्ह्यातील देगलूर पोलिसांनी केलेल्या कारवाआईत 19 लाख 44 हजार रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत अवैधरित्या गुटखा घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये 40 गोण्या गुटखा जप्त केला आहे. प्रत्येक गोणीमध्ये 6 छोटया बॅग, बॅगमध्ये 54 पॅकेट असे एकत्रीत 12 हजार 960 पॅकेट किंमत एकूण 19 लाख 44 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक मधील (एम एच 18- अेअे 1666) प्रतिबंधित अन्न पदार्थाची 12 जूनला अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर यांनी तपासणी केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोमीनपुरा येथील आरोपी वाहन मालक गुलामखान गौसाखान आणि कंधार तालुक्यातील गउफळ -आंबुलगा येथील वाहन चालक बालाजी नागोराव श्रीमंगले(वय 50) यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायदा व भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर व संतोष कनकावाड तसेच नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक बी.एम. धबडगे, पोलिस उपनिरीक्षक एम.एस. ठाकूर तसेच पोलीस हवालदार लुंगारे, यमलवाड यांच्या सहकार्याने केली आहे.

दरम्यान, प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details