मुंबई - क्रोएशिया संघाचे सदस्य आणि माजी व्यवस्थापक इगोर स्टिमाक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. एआयएफएफच्या तांत्रिक समितीने प्रशिक्षक पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. स्टिमाक हे, क्रोएशियाई संघाचे सदस्य होते. त्यांचे नाव तांत्रिक समितीने निवडले आहे. ५१ वर्षांचे स्टिमाक हे दोन वर्ष भारतीय संघाला प्रशिक्षण देणार आहेत.
स्टिमाक यांनी राष्ट्रीय संघासोबतच अनेक क्लब संघांना मार्गदर्शन केले आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली हाजूक स्प्लिटने २००४-०५ मध्ये क्रोएशियन फुटबॉल लीग जिंकली होती.