महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

विश्वकरंडात धोनी नाही, 'हा' आहे यशस्वी यष्टीरक्षक - कुमार संगकारा

विश्वकरंडकात श्रीलंकेचा कुमार संगाकारा हा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे.

कुमार संगकारा

By

Published : May 16, 2019, 9:53 AM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्याच्या घडीला जगातील अव्वल यष्टीरक्षक मानला जातो. विश्वकरंडकातील त्याच्या कामगिरीबाबत विचार केल्यास या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. महेंद्र सिंह धोनीने विश्वकरंडकातील २० सामन्यांत एकूण ३२ फलंदाजांना माघारी धाडले आहे. यात त्याने २७ झेल घेतले तर ५ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

विश्वकरंडकात श्रीलंकेचा कुमार संगाकारा हा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याने ३७ सामन्यांत ५४ फलंदाजांना माघारी धाडले. यात त्याने ४१ झेल आणि १३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर अॅडम गिलख्रिस्ट आहे. त्याने ३१ सामन्यांत ५२ बळी घेतले आहेत. यामध्ये ४५ झेल आणि ७ जणांना यष्टीचीत केले.

इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वकरंडकाला सुरुवात होत आहे. धोनीला यंदा संगकारा आणि गिलख्रिस्ट यांना मागे टाकण्याची संधी आहे. धोनीचे हा चौथा विश्वकरंडक आहे. विश्वकरंडकात सर्वात यशस्वी यष्टीरक्षकांमध्ये धोनी एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details