लाहोर - इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरू होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा पत्ता कट करण्यात आला आहे. पाकच्या संघाचे नेतृत्व सर्फराज अहमदच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; मोहम्मद आमिरचा पत्ता कट - मोहम्मद आमिर
संघात शोएब मलिक, बाबर आजम आणि मोहम्मद हफीज या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान यालाही संधी नाकारण्यात आली आहे. त्याने ५ सामन्यात २३१ धावा केल्या होत्या. त्यात २ शानदार शतकाचा समावेश आहे. संघात शोएब मलिक, बाबर आजम आणि मोहम्मद हफीज या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला पाकिस्तानचा संघ
सरफराज अहमद (कर्णधार), फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम, शादाब खान, शोएब मलिक, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हसन अली, आबीद अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद हसनैन, हरिस सोहेल.
TAGGED:
मोहम्मद आमिर