महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

राखीव खेळाडूंमध्ये वेस्टइंडीजने 'या' अष्टपैलू खेळाडूंना दिले स्थान

या १० खेळाडूंमध्ये सुनील अम्बरीस, ड्वेन ब्रावो, जॉन कॅम्पबेल, जोनाथन कार्टर, रोस्टन चेज, शेन डाउरिच, कीमो पॉल, कॅरी पियरे, रेमोन रिफर, कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे.

ड्वेन ब्रावो

By

Published : May 19, 2019, 1:02 PM IST

बार्बाडोस - इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या विंडीज संघाच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या स्पर्धेसाठी विंडीजने १५ सदस्सीय संघाची घोषणाही केली आहे. यामध्ये सुरुवातीला कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, राखीव १० खेळाडूंमध्ये या दोघांना निवड समितीने स्थान दिले आहे.

विंडीज संघातील १५ सदस्यांपैकी कोणत्याही एका खेळाडूला दुखापत झाल्यास या राखीव १० खेळाडूंमधील एकाला विश्वकरंडकात खेळण्याची संधी मिळू शकते. या १० खेळाडूंमध्ये सुनील अम्बरीस, ड्वेन ब्रावो, जॉन कॅम्पबेल, जोनाथन कार्टर, रोस्टन चेज, शेन डाउरिच, कीमो पॉल, कॅरी पियरे, रेमोन रिफर, कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे.

ड्वेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्ड यांसारख्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना सुरुवातीला संघात स्थान न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघेही संघासाठी उपयुक्त कामगिरी बजावू शकतात. १० जणांच्या या राखीव खेळाडूंमध्ये सुनील अंब्रोस यालाही संधी दिली आहे.

सुनिलने नुकत्याच झालेल्या तिंरगी मालिकेतील ४ सामन्यात अनुक्रमे नाबाद ६९, २३, १२८ आणि ३८ धावांची खेळी करत छाप सोडली आहे. विंडीज संघाचे १९ मे रोजी इंग्लंडच्या साउथम्पटन येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विश्वकरंडकात विंडीजचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details