महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

जागतिक सीसीटीव्ही सुरक्षा सर्व्हेतील टॉप 20 शहरांमध्ये हैदराबाद 16 व्या स्थानी

हा सर्व्हे लंडन येथील कांपारिटेक कंपनीने केला होता. या कंपनीने जगातील 150 देशात हा सर्व्हे केला होता. यात शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास महत्वपूर्ण असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बाबतीत हैदराबाद 16 व्या क्रमांकावर आहे.

Hyderabad
Hyderabad

By

Published : Jul 25, 2020, 7:26 PM IST

हैदराबाद- जगातील 150 शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीबाबत एक जागतिक सर्व्हे घेण्यात आला होता. या सर्व्हेत हैदराबाद शहराने 16 वा क्रमांक पटकाविला आहे.

हा सर्व्हे लंडन येथील कांपारिटेक कंपनीने केला होता. अँटिव्हायरस, व्हर्चुअल प्रॉक्झी नेटवर्क यासारख्या तांत्रिक व सुरक्षात्मक बाबींवर काम करणाऱ्या या कंपनीने जगातील 150 देशात हा सर्व्हे केला होता. यात शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास महत्वपूर्ण असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बाबतीत हैदराबाद 16 व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, या सर्व्हेत दिल्ली आणि चेन्नई या शहरांचा देखील सुरुवातीच्या 50 शहरांमध्ये समावेश आहे. चेन्नई 21 व्या स्थानावर असून शहरात 2.8 लाख सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर दिल्ली 33 व्या स्थानावर असून येथे 4.29 लाख कॅमेरे आहेत. तसेच, सर्व्हेत आघाडीवर असणाऱ्या हैदराबाद शहरात 3 लाख कॅमेरे असून हजारव्यक्तींसाठी 30 कॅमेरे सेवेत आहेत, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

तसेच, सर्व्हेत पहिला क्रमांक चीनच्या तैवान या शहराने पटकाविला आहे. तैवान शहरात 4.56 लाख कॅमेरे असून हजारलोकांसाठी 119.57 कॅमेरे सेवेत आहेत. अहवालानुसार सर्व्हेतील सर्वोच्च 20 शहरांपैकी 18 शहर चीनमधील, तर 20 शहरांमध्ये येण्याच्या मान हैदराबाद आणि लंडनने मिळवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details