महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

'पुण्यात हौसिंग सोसायट्यांनी कोरोनाबाबत नागरिकांवर वैयक्तिक नियम लादू नयेत'

सहकारी गृहनिर्माण संस्था (हौसिंग सोसायटी) आणि इतर गृह निर्माण संस्थाबाबत राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणू अनुषंगाने दिलेल्या सूचना नुसारच गृहनिर्माण संस्थांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत कोरोना विषाणू बाधित रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्याबाबतीत गृहनिर्माण संस्था यांचेकडून स्वतःचे नियम तयार करून सोसायटीमध्ये बंधने घालण्यात येत आहे.

pune corona news
pune corona news

By

Published : Jun 10, 2020, 9:37 PM IST

पुणे - शहरातील हौसिंग सोसायट्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी वैयक्तिक बंधने घालून नियम घातल्यचे निदर्शनास आले आहे. अशा घटना समोर आल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून असे वैयक्तिक नियम लावणाऱ्या गृह सोसायट्यांना चाप लावला आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था (हौसिंग सोसायटी) आणि इतर गृह निर्माण संस्थाबाबत राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणू अनुषंगाने दिलेल्या सूचना नुसारच गृहनिर्माण संस्थांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत कोरोना विषाणू बाधित रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्याबाबतीत गृहनिर्माण संस्था यांचेकडून स्वतःचे नियम तयार करून सोसायटीमध्ये बंधने घालण्यात येत आहे.

वास्तविक पाहता गृहनिर्माण संस्था, हौसिंग सोसायटी यांनी कोरोना विषाणु प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्क वापरणे, निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटाझरचा वापर करणे, साबणाने हात धुणे, वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्रिया यांची काळजी घेणे, सामाजिक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी याबाबत समाज जागृती आणि उपाययोजना सोसायटीमध्ये करणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता काही ठिकाणी सोसायट्या त्यांच्या पातळीवर नियम करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे.

दरम्यान, या आदेशानुसार सोसायटीमधील कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत आत्यानंतर त्यांचेवर, त्यांचे नातेवाईक, केअर टेकर यांचेवर बहिष्कार घालण्यात येऊ नये, तसेच सोसायटीमधील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांना योग्य पदधतीने वागणूक देण्यात यावी. त्यांना कर्तव्यावर येणे-जाणे करिता प्रतिबंध करू नये. सोसायटीमधील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणा-या व्यक्ती संस्था उदा. प्लंबर, इलेक्ट्रीशियन गॅस आणि पाणी सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना सोसायटीमध्ये येणे-जाणे करिता प्रतिबंध करु नये, असे या आदेशात म्हटले आहे. तसेच सोसायटीने स्वतःची वैयक्तिक बंधने न लादता राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details