सातारा- जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कृष्णा, सह्याद्री आणि शारदा रुग्णालयात 180 खाटांची सोय करण्यात आली होती. परंतु, आता तिन्ही रुग्णालये पूर्णतः भरलेली आहेत, त्यामुळे कोविड रुग्णालयांसाठी अन्य रुग्णालय अधिग्रहण करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.
कराडमध्ये कोरोनाचा उद्रेक, 3 कोविड रुग्णालये फुल्ल; रुग्णांची फरफट
कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जिल्ह्यात कराड तालुका प्रथम आणि सातारा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे. कराड तालुक्यातील रुग्ण संख्या 534, सातारा तालुक्यातील संख्या 417 आणि जावली तालुक्यातील संख्या 319 झाली आहे. वाईमध्ये 306, तर पाटणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 200 पार गेली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जिल्ह्यात कराड तालुका प्रथम आणि सातारा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे. कराड तालुक्यातील रुग्ण संख्या 534, सातारा तालुक्यातील संख्या 417 आणि जावली तालुक्यातील संख्या 319 झाली आहे. वाईमध्ये 306, तर पाटणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 200 पार गेली आहे. आतापर्यंत 1 हजार 370 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 1 हजार 99 रुग्ण उपचार घेत आहेत.
कराड शहरात काल कोरोनाचे 5 आणि तालुक्यात 22 रुग्ण आढळले आहेत. मंगळवारपर्यंत सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 हजार 557 झाली आहे. त्यापैकी 1 हजार 439 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 87 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 31 जणांवर उपचार सुरू आहेत. कराड तालुक्यातील रुग्णालय संपूर्ण भरल्याने उर्वरित रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे, आता इतर रुग्णालये अधिग्रहण करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.