मुंबई- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता मात्र आता टप्प्याटप्प्याने अनलॉक अंतर्गत रेल्वेगाड्यांची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेच्या मध्य व पश्चिम मार्गावर फेऱ्या वाढविण्यात याव्या, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व रेल्वेला केली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दिवसभरात अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 512 फेऱ्या चालत असून मध्य मार्गावर 431 लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, मध्य मार्गावर 600 फेऱ्या व पश्चिम मार्गावर 700 फेऱ्या चालवण्यात याव्यात, अशा सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकार व रेल्वेला केल्या आहेत.
मुंबईत लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवा - उच्च न्यायालय - Mumbai local news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपासून खासगी कंपन्यांची कार्यालय बंद होती. मात्र अनलॉक 5 अंतर्गत आता खासगी व सरकारी कार्यालयांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र याच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत असून लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने या सूचना दिल्या आहेत. दरम्यान या अगोदर दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान वकील संघटनांनी केलेल्या सूचना राज्य सरकारला द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहे. तर त्यातील योग्य त्या सूचनांवर विचार करून त्यावर राज्य सरकार नियोजन कशाप्रकारे करता येईल, याबद्दलच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यात कोरोनाचे संक्रमण पाहता गेल्या काही महिन्यांपासून खासगी कंपन्यांची कार्यालये बंद होते. मात्र अनलॉक 5 अंतर्गत खासगी व सरकारी कार्यालयांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्याची परवानगी देण्यात येत आहे. यामुळे मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा ताण पडत असून लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे.