नाशिक - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र असे असले तरी या पावसामुळे वातावरणातील उकाडा कामी झाल्यानं नागरिकांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असला तरी मात्र शहरात अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानं वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. पावसाने दांडी मारल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
जिल्ह्यातील पंचवटी,सातपूर,गंगापूररोड,शरणपूर रोड,सिडको,मेनरोड,नाशिकरोड यासह विविध ठिकाणी पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने नागरिकांची दाणादाण उडल्याच बघायला मिळाले. तर शहरात सुरू असलेल्या काही तासाच्या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाल्याचे बघायला मिळाले. यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. तसेच कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली. पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण होते. दरम्यान
मध्यंतरी पावसाने दांडी मारल्याने शहरात उकाडा वाढला होता. जवळपास 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात निर्माण झालेला उकाडा काहीसा कमी झाला आहे. यामुळे नाशिककरांना देखील दिलासा मिळाला आहे.