महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कराड तालुक्यात जोरदार पाऊस, 112 मी. मी.ची नोंद

कराड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला.

Karad
Karad

By

Published : Apr 14, 2021, 4:31 PM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. अवघ्या दोन तासात 8.61 इतक्या सरासरीने कराड तालुक्यातील 9 मंडलमध्ये 112 मी. मी. पावसाची नोंद झाली. मात्र, कराड उत्तरमधील मसूर, कवठे आणि दक्षिणमधील शेणोली, काले परिसराला वादळी पावसाने हुलकावणी दिली.

कराड तालुक्यात मंगळवारी मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : कराड 23 मी. मी., मलकापूर 22 मी. मी., सैदापूर 20 मी. मी., कोपर्डे हवेली 18 मी. मी., उंब्रज 12 मी. मी., कोळे 5 मी. मी., उंडाळे 4 मी. मी., सुपने 6 मी. मी., इंदोली 2 मी. मी.

उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

या वादळी पावसाने कराड तालुक्यातील कोठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तसेच पिकांसाठीही हा पाऊस पोषक ठरला आहे. गेल्या अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही पावसामुळे दिलासा मिळाला. मंगळवारी रात्री हवेत गारवा निर्माण झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details