हिंगोली -जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असता, वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची गती पाहून जणू काय पावसाळाच सुरू झाला आहे याचाच अनुभव येत होता.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढलेली असताना, प्रत्येक जण हैराण झाला आहे. अशातच पावसाने हजेरी लावली, यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांनी हळद वाळवण्यासाठी शेतात, छतावर टाकलेली आहे. तर विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसात वसमत तालुक्यातील पुयना येथील शेतकरी साहेबराव ब्रह्माजी जामगे (५०) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.