महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

हार्दिक पंड्याची बीसीसीआयचे लोकपाल जैन यांच्यासमोर सुनावणी - hardik pandya deposes before bcci ombudsman kl rahul to meet on wednesday

कॉफी विथ करण हा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित झाला होता. यानंतर राहुल आणि पंड्या यांच्या विरोधात देशभरात संतापची लाट पसरली होती.

हार्दिक पंड्या

By

Published : Apr 10, 2019, 7:11 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या मंगळवारी बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर झाला. त्याने कॉफी विथ करण, या कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणातील दुसरा खेळाडू के. एल. राहुल बुधावारी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी लोकपालां समोर हजर होईल.

आयपीएलमध्ये हार्दिक पंड्या मुंबईच्या संघात तर राहुल पंजाबच्या संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले लोकपाल न्यायमूर्ती डी. के. जैन यांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राहुल आणि हार्दिक यांना मागील आठवड्यात नोटिस पाठवली होती.

डी.के. जैन सीएजी विनोद रॉय यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीकडे या घटनेचा अहवाल पाठवून देणार आहे. कॉफी विथ करण हा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित झाला होता. यानंतर राहुल आणि पंड्या यांच्या विरोधात देशभरात संतापची लाट पसरली होती.

बीसीसीआयच्या सीईओने त्या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावले आणि त्यांना निलंबित करून टाकले. हार्दिक आणि राहुल यांनी या प्रकरणाबद्दल जाहीररित्या माफी मागितली होती. त्यानंतर त्यांच्यावरील बंदी काही काळासाठी मागे घेण्यात आली होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details