ठाणे - भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रूग्ण संख्या ही भिवंडीतील नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे. शुक्रवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे 37 नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात 23 नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण आणि शहरात मिळून एकूण 60 नवे रुग्णांची वाढ एकाच दिवसात झाल्याने शशहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसह आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाचे नवे हॉटस्पॉट भिवंडी.. एका दिवसात आढळले 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण - भिवंडी कोरोना
भिवंडी शहरात आतापर्यंत 432 रुग्ण आढळले असून त्यापैकी 164 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 21 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 247 रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 232 रुग्ण आढळले असून त्यापैकी 92 रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामिण भागातील 4 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 136 रुग्णांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, शुक्रवारी आढळलेल्या 60 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 664 वर पोहचला आहे. त्यापैकी 256 रुग्ण बरे झाले आहेत तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून 383 रुग्णांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.