करमाळा (सोलापूर) -उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. तालुक्यातील उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रातील बागायती भागात सध्या उन्हाळी भुईमूग काढणीला वेग आला आहे. मध्यंतरी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने भुईमूग काढणी थांबली होती. मात्र, पुन्हा एकदा कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा भुईमूग काढणी सुरू झाली आहे.
उजनी लाभक्षेत्रातील बागायती भागात उन्हाळी भुईमूग काढणीला वेग - उजनी लाभक्षेत्रातील भुईमूग काढणी
शेतकरी, शेतमजूर महिला वर्ग शेतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शारीरिक अंतराचे पालन करत भूईमूग शेंगा काढण्याच्या कामात गुंतला आहे. भुईमूगाच्या पिकाच्या वेलींचा उपयोग गुरांच्या चाऱ्यासाठी होत असल्याने शेतकरी वेलवर्गीय पाला एकत्रित करून ठेवत आहे.
भुईमूग शेंगा काढणीसाठी शेतकरी, शेतमजूर महिला वर्ग शेतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शारीरिक अंतराचे पालन करत शेंगा काढण्याच्या कामात गुंतला आहे. भुईमूगाच्या पिकाच्या वेलींचा उपयोग गुरांच्या चाऱ्यासाठी होत असल्याने शेतकरी वेलवर्गीय पाला एकत्रित करून ठेवत आहे.
दरम्यान, परिसरात रानडुकरांची संख्या मोठी असल्याने भुईमूगाचे पीक कमी प्रमाणात घेतले जाते. सध्या शेतकऱ्यांनी आपल्या रिकाम्या असलेल्या शेतात गरेजपुरतेच अर्धा एकर, 2 ते 5 गुंठे एवढ्या क्षेत्रावरच भुईमूग पीक घेतले आहे. भुईमूगाचे एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन अपेक्षित असल्याचे पारेवाडी येथील भुईमूग उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.