मुंबई - सध्याच्या कोविड संकटकाळात बंधपत्रित नर्सेस अत्यंत मोलाची आरोग्य सेवा बजावत आहेत. 'कोविड योद्धे' असा त्यांचा शाब्दिक गौरव करून त्यांच्या समस्या सुटणार नाहीत, तर त्यांच्याप्रति संवेदनशीलताही दाखवायला हवी, असे अमित ठाकरे म्हणाले.
राज्यातील बंधपत्रित डाॅक्टर्स आणि अधिपरिचारिका (नर्सेस) यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या मागणीनंतर राज्य सरकारने बंधपत्रित डाॅक्टरांचा पगार सुमारे 15 ते 20 हजार रुपयांनी वाढवला. मात्र दुर्दैवाने, बंधपत्रित नर्सेसबाबत सरकारने कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही. बंधपत्रित नर्सेसच्या समस्यांबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी, असे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.