यवतमाळ- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 94.63 टक्के लागला आहे. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारत यशाची घोडदौड कायम राखली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 39 हजार 218 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात परीक्षेला 38 हजार 863 विद्यार्थी बसले. परीक्षेत एकूण 36 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहा हजार 651 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. 14 हजार 714 विद्यार्थी प्रश्रम श्रेणीत, 9 हजार 136 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर 2 हजार 277 विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.
टक्केवारीच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा हा अमरावती विभागात चौथ्या क्रमांकावर आहे. अकोला जिल्ह्याची टक्केवारी 95.52, अमरावती 93.94, बुलडाणा 96.10, यवतमाळ 94.63, वाशीम 96.08 अशी आहे.
यवतमाळ जिल्हा तालुकानिहाय निकाल
यवतमाळ- 95.69
नेर-97.06
दारव्हा-93.25
दिग्रस-96.43
आर्णी-94.16