महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

साताऱ्यात महागड्या दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; चौघांना अटक - Bike stolen satara

पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या युवकांवर पाळत ठेवून एका युवकास ताब्यात घेतले होते. या युवकाने अन्य चार साथिदारांसोबत मेढा, वाई, खंडाळा, सातारा तालुका, सातारा शहर या ठिकाणांहून यामाहा कंपनीच्या 2 दुचाक्या, 3 पल्सर व 2 स्प्लेंडर दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

Bike thiefs satara
Bike thiefs satara

By

Published : Jul 18, 2020, 10:45 PM IST

सातारा- तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 5 चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 लाख रुपये किंमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी उडतारे येथील ज्ञानेश्वर जाधव, सुरज साबळे, प्रशांत बाबर, प्रज्योज भागवत (बावधन, वाई) याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक जण अल्पवयीन आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या युवकांवर पाळत ठेवून एका युवकास ताब्यात घेतले होते. या युवकाने अन्य चार साथिदारांसोबत मेढा, वाई, खंडाळा, सातारा तालुका, सातारा शहर या ठिकाणांहून यामाहा कंपनीच्या 2 दुचाकी, 3 पल्सर व 2 स्प्लेंडर दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी कारवाईत 7 दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व हवालदार डी.बी. बर्गे, दादा परिहार, सुजीत भोसले, उत्तम पवार, सागर निकम, संदीप कुंभार, नितीराज थोरात, हवालदार विनोद गायकवाड, सुधीर बनकर, संतोष जाधव, गणेश कापरे, धीरज महाडिक, वैभव सावंत, संजय जाधव यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details