अहमदनगर - जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात 14 जण कोरोनामुक्त झाले झाले आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आज (शनिवार) दुपारपर्यंत 9 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे तब्बल 14 रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 61 रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अहमदनगरमध्ये एकाच दिवसात १४ जण कोरोनामुक्त आतापर्यंत १०९ रूग्णांना डिस्चार्ज - अहमदनगर कोरोना बातमी
अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी तब्बल 14 रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 61 रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शिवाय कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील दोन जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. याची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर घेण्यात आल्याने रुग्ण संख्येत 3 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 207 वर पोहचली आहे. महानगरपालिका क्षेत्रात 46, अहमदनगर जिल्ह्यात 104 आणि इतर राज्यातील 2, इतर देशातून आलेले 8 आणि इतर जिल्ह्यातील 47 रूग्ण आहेत. जिल्हयातील सध्या कोरोनाचे 87 अॅक्टिव रूग्ण असून आतपर्यंत एकूण 2904 जणांच्या कोरोना तपासणी झाली आहे. त्यामध्ये 2634 जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 26 जणांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत. अजूनपर्यंत 26 जणांचे अहवाल प्राप्त होणार आहेत.