महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चंद्रपूर जिल्हातील कोरोनाबधितांची संख्या ४७ वर;  रविवारी आढळले तीन नवे रूग्ण - chandrapur corona news

सुमित्रा नगर, तुकूम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत रुग्णाची ४७ वर्षीय पत्नी आणि ३० वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून दोघींची प्रकृती स्थिर आहे. यातील दुसरा २० वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधितांच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

chandrapur corona news
chandrapur corona news

By

Published : Jun 14, 2020, 8:47 PM IST

चंद्रपूर - शहरातील तुकूम परिसरात आणखी दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे या महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह कोरोनाबाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४७ झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमित्रा नगर, तुकूम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत रुग्णाची ४७ वर्षीय पत्नी आणि ३० वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून दोघींची प्रकृती स्थिर आहे. यातील दुसरा २० वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधितांच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे (1), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) आणि १४ जून ( एकूण ३ बाधीत ) रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ झाली आहेत. आतापर्यत २४ कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ४४ पैकी बाधीतांची संख्या आता २३ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details